वंदना गुप्ते, डॉ. गजानन रत्नपारखी यांना ‘राजहंस’ पुरस्कार, रविवारी गौरव सोहळा

वंदना गुप्ते, डॉ. गजानन रत्नपारखी यांना ‘राजहंस’ पुरस्कार, रविवारी गौरव सोहळा

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, उत्तमजी पाटील, प्रख्यात हृदयविकारतज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी आणि विश्लेषक आणि समीक्षक डॉ. उदय निरगुडकर तसेच टच संस्थेचे डॉ. श्रीकांत सर्वगोड यांना राजहंस प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे ‘राजहंस’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालयाच्या प्रांगणात रविवार, 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

राजहंस प्रतिष्ठान गेली 21 वर्षे समर्पित भावनेने विनामूल्य रुग्णसेवा करीत आहे. कला व रुग्णसेवेसाठी समर्पित असलेल्या राजहंस प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘राजहंस’ पुरस्काराने गौरवण्यात येते. रविवारी होणार्या पुरस्कार प्रदान सोहळ्यास ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋणमयी भजक करणार आहेत. याचवेळी डॉ. महेश अभ्यंकर व श्रेया अभ्यंकर लिखित ‘रँक’ या पुस्तकाचे डॉ. मुणगेकर यांच्या हस्ते प्रकाशन होणार असल्याची माहिती राजहंस प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष सुहास कबरे यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;