38th National Games- कोल्हापूरच्या स्वाती शिंदचे सुवर्ण स्वप्न साकार, आदर्शला रौप्य

38th National Games- कोल्हापूरच्या स्वाती शिंदचे सुवर्ण स्वप्न साकार, आदर्शला रौप्य

कोल्हापूरच्या जिगरबाज स्वाती शिंदेने गेली दशकभर ऊराशी बाळगलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न उत्तराखंडात साकार केले. आदर्श पाटीलला रौप्य पदकावर समाधान मानाने लागले.

रोशनाबाद येथील योगस्थळ हॉलमधील कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या यशाचा जल्लोष शेवटच्या दिवशीही घुमला. 53 किलो वजन गटात स्वाती शिंदेने मध्य प्रदेशच्या पुजा जाटला 5-1 गुणांनी नमवून स्पर्धेतील महाराष्ट्रासाठी कुस्तीतील एकमेव सुवर्णयश संपादन केले. उपांत्य फेरीत कुस्तीला 25 सेकंद बाकी असताना दंगल चित्रपटाची आठवण करून देणारा 4 गुणांचा साईट थ्रो मारून स्वातीने हरियाणाच्या ज्योतीला नमवून कुस्तीशौकिनांची मने जिंकली होती.

मध्य प्रदेशची आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पूजा जाट विरूध्द स्वाती शिंदने कडवी झुंज दिली. पहिल्या फेरीमध्ये स्वातीत केवळ 1 गुणांनी आघाडीवर होती. दुसर्‍या फेरीमध्ये स्वातीने भारंदाज डावावर सलग 4 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल प्रशिक्षक दादा लवटे यांच्या मार्गदर्शन स्वातीला मिळत आहे.

अंतिम लढतीत तुफानी कुस्ती करीत स्वातीन मैदान गाजवले. 74 किलो फ्रीस्टाईल गटात कोल्हापूरचा आदर्श पाटील सेनादलाचा जयदिप 10-0 गुणाने पराभूत व्हावे लागले. हरिद्वार येथे संपलेल्या कुस्ती स्पर्धेत 1 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कांस्य अशी 9 पदकांची लूट महाराष्ट्राच्या मल्लांनी केली. स्वाती शिंदेने सुवर्ण, भाग्यश्री फंड, आदर्श पाटीलने रौप्य, तर अक्षय डेरे, हर्षवर्धन सदगीर, अमृता पुजारी, हितेश सोनावणे , दिग्विजय भोंडवे, पै.अश्लेशा बागडे, आदर्श पाटील यांनी कांस्य पदकावर नाव कोरले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;