द कपिल शर्मा शो सोडण्याचं कारण स्पष्ट केलं, सुमोना चक्रवर्ती झाली व्यक्त

द कपिल शर्मा शो सोडण्याचं कारण स्पष्ट केलं, सुमोना चक्रवर्ती झाली व्यक्त

द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती या कॉमेडी शो मध्ये ऑनस्क्रिन कपिलच्या पत्नीची भूमिका निभवताना दिसत होती. मात्र नुकताच सुमोनाने काही वैयक्तीक कारणाने हा शो सोडला आहे. शो सोडल्यानंतर सुमोनाने एका मुलाखतीत काही सिक्रेट्सचा खुलासा केला आहे. त्यामध्ये तीने सांगितले की, कॉमेडी तिच्यासाठी अॅक्टींग सारखीच आहे. ते सर्व स्क्रिप्टेड असते.

सुमोनाने एका यूट्यूब मुलाखतीदरम्यान सांगितले की मला कॉमेडी करायला फारसे आवडत नाही. मी जेव्हा-जेव्हा कॉमेडी केली आहे तेव्हा-तेव्हा मला ते जमायला फार वेळ लागला. मला माझी स्वत:ची विनोदबुद्धी आहे. पण ते कदाचित कपिलच्या शोला शोभणारी नाही. आणि माझ्यासाठी कपिलच्या शोमध्ये काम करणे म्हणजे फक्त अभिनय होता. मला स्क्रिप्ट वाचायला आणि लक्षात ठेवायला खूप वेळ लागला आणि कॉमेडी करणं माझ्यासाठी कठीण होतं.

“जेव्हा आम्हाला स्क्रिप्ट द्यायचे, तेव्हा मी अशा लोकांपैकी एक असायचे जे हातात पेन आणि कागद घेऊन बसतात. आणि ओळी हायलाइट करतात. मी स्क्रिप्ट वाचल्या नंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायची. कारण त्या पंच लाईन्स होत्या. आणि त्याहूनही अधिक, मला कपिलच्या ओळी देखील आठवायचे होते. कारण स्क्रिप्ट टायमिंग देखील महत्त्वाचे होते. जर कपिल त्याच्या ओळी बोलला आणि मी गप्प राहिली तर मी अडचणीत येण्याची शक्यता होती. म्हणूनच मी बऱ्याच वेळा कपिलच्या ओळी देखील लक्षात ठेवायची, जेणेकरून स्क्रिप्ट टायमिंग योग्य बसेल आणि त्यात “जर एखाद्या अभिनेत्याने ऑन द स्पॉट ओळींमध्ये थोडासा बदल केला तर मी पुन्हा स्क्रिप्ट पाहायची. मला स्क्रिप्टमध्ये कोणताही बदल नको हवा होता. कारण नंतर मला लक्षात ठेवण्याच्या समस्या येत होत्या. खरेतर मी कपिलचे खूप कौतुक करते. पण कॉमेडी हा माझा प्रकार नाही. म्हणूनच मी द कपिल शर्मा शोपासून दूर राहिली.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;