उन्हाळ्यात दररोज एक ग्लास बेल फळाचा ज्यूस प्या, आश्चर्यकारक फायदे अनुभवा

उन्हाळ्यात दररोज एक ग्लास बेल फळाचा ज्यूस प्या, आश्चर्यकारक फायदे अनुभवा

आला उन्हाळा तब्येत सांभाळा हे वाक्य आपण वारंवार ऐकलेले आहे. उन्हाळा आल्यावर बाजारात आपल्याला अनेक फळे दिसू लागतात. हंगामी फळे खाणे हे केव्हाही हितकारक असते. असंच एक उन्हातील फळ म्हणजे बेलफळ. बेलफळ ही अलीकडे फारसे कुणाला माहीत नाही. परंतु या फळाचे फायदे मात्र अगणित आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात किमान एकदा तरी हे फळ खायलाच हवे.

उन्हाळ्यात बेलाचा रस पिणे हे खूप फायदेशीर आहे. तुम्ही उन्हाळ्यात बेल फळाचा रस प्यायला तर तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. चांगली प्रतिकारशक्ती शरीराला रोगांशी लढण्यास सक्षम करते. प्रथिने, बीटा-कॅरोटीन, थायामिन, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी सारखी पोषक तत्वे बेल फळाच्या रसात आढळतात. बेल फळात ए, बी आणि सी ही पोषक तत्वे फार मोठ्या प्रमाणावर आढळतात. बेल फळापासून मुरंबा तसेच सरबतही बनवता येतो.

बेलाचा रस रक्त शुद्धीसाठी देखील खूप फायदेशीर आहे. रक्तशुद्धी साठी अनेक प्रकारची औषधे देखील उपलब्ध आहेत, परंतु बेलाचा रस हा एक नैसर्गिक पर्याय आहे, जो तुम्ही अवलंबू शकता. याशिवाय बेलाच्या रसात तूप मिसळून काही प्रमाणात सेवन केल्यास त्याचा फायदा दिसून येतो. यामुळे हृदयाचे आजार दूर राहतात. म्हणजेच हृदयविकाराचा धोका कमी होतो. या रसाचे सेवन महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. स्तनाच्या कर्करोगा पासून संरक्षण करते. यासोबतच स्तनपान करणाऱ्या महिलांसाठीही बेलाचा रस उपयुक्त आहे, त्याच्या सेवनाने आईचे दुध वाढते.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;