गंदी बात… रणवीर अलाहाबादियापूर्वी या सेलिब्रिटीच्या वक्तव्यानेही देशात माजला होता गदारोळ

गंदी बात… रणवीर अलाहाबादियापूर्वी या सेलिब्रिटीच्या वक्तव्यानेही देशात माजला होता गदारोळ

Hardik Pandya Vulger Comment : बोलताना नेहमी विचार करून बोलावं असे आपल्याकडे मोठी माणसं नेहमी सांगत असतात. एक विधान करिअरसाठी आणि प्रतिष्ठेसाठी किती धोकादायक, जोखमीचं ठरू शकतं हे आज कोणी समय रैना आणि रणवीर अलाहबादियाला विचारून पहा. काही दिवसांपूर्वी इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये आलेल्या रणवीरने जे विधान केलं, त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. त्यावर सोशल मीडियावर प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करत असून अनेक जण रणवीरला ट्रोलही करत आहेत. पालकांवरून जो प्रश्न विचारला तो प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीररला खूप महागात पडला आहे. मात्र त्याच्यापूर्वी आधीही एका सेलिब्रिटीने असंच एक विधान केलं होतं
रणवीर प्रमाणेच आणखी एक सेलिब्रिटीही अशाच एक विधानामुळे चर्चेत आला होता. तो म्हणजे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या. त्याने केलेल्या अश्लील विधानामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला होता.

कॉफी विथ करण मध्ये काय म्हणाला होता हार्दिक पंड्या ?

हार्दिक पांड्या हा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध शोमध्ये गेला होता, त्याच्यासोबत त्याचा सहकारी क्रिकेटर केएल राहुलही होता. त्यावेळी घरातील वातावरण आणि मोकळेपणाबद्दल झालेल्या संवादादरम्यान हार्दिकने एक विधान केलं ज्याने गदारोळ माजला. त्याने जेव्हा पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले, तेव्हा त्याने घरी येऊन थेट सांगितलं होतं , आज मी करून आलो…. असं घरी सांगितल्याचं त्याने नमूद केलं. मात्र एका टॉक शोमध्ये असं विधान केल्याने त्याला बरीच टीका सहन करावी लागली होती.

सोशल मीडिया आणि टीव्हीवर एवढा गदारोळ झाला की हार्दिकला माफी देखील मागावी लागली. यानंतर बीसीसीआयने क्रिकेटपटूंना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाऊन तेथे वक्तव्य करण्याबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन्ही क्रिकेटपटूंवर बीसीसीआयने तात्पुरत निलंबनाची कारवाई केली होती. तसेच त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतही बोलावलं होतं. शोमध्ये हार्दिकच्या वक्तव्यानंतर झालेला गोंधळ पाहून शोच्या निर्मात्यांना तो भाग हटवावा लागला होता.

रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाने मागितली माफी

दरम्यान, रणवीरच्या ज्या वक्तव्यामुळे तो अडचणीत सापडला आहे, त्याबद्दल त्याने बिनशर्त माफी मागितली आहे. कॉमेडी हा माझा झोन नसून असे बोलल्याबद्दल माफी मागतो असे तो म्हणाला. या संपूर्ण गदारोळानंतर समय रैनानेही मौन सोडलं. माझा उद्देश लोकांना हसवण्याचा होता. आपण चॅनेलवरून सर्व एपिसोड हटवत असल्याचे त्याने नमूद केलं, तसेच कायदेशीर कारवाईत एजन्सींना सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्याने सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;