लग्नात वऱ्हाडी म्हणून अचानक घुसला बिबट्या, मंडपात उडाला एकच गोंधळ

लग्नात वऱ्हाडी म्हणून अचानक घुसला बिबट्या, मंडपात उडाला एकच गोंधळ

लखनऊमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ऐन लग्नसमारंभात बिबट्याने एन्ट्री केल्याने वधू-वरासह वऱ्ह्याड्यांची एकच भंबेरी उडाली. रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन राबवत वन विभागाने अखेर बिबट्याची सुटका केली आणि वऱ्हाड्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

आलमबागमधील रहिवासी असलेला अक्षय श्रीवास्तवचा लखनऊ शहरातील बुद्धेश्वर रिंगरोडवर असलेल्या एका हॉलमध्ये बुधवारी रात्री विवाहसोहळा सुरू होता. हॉलमध्ये वधू-वर फोटोशूटमध्ये बिझी होते, तर वऱ्हाडी जेवणावर ताव मारत होते. इतक्यात फोटोग्राफरला वरच्या मजल्यावर बिबट्याला पाहिले आणि त्यानंतर हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. वधू-वर फोटोशूट सोडून तर वऱ्हाडी जेवणाची ताटं सोडून जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. लग्नाच्या हॉलमध्ये एकच कल्लोळ माजला.

दरम्यान, बिबट्या हॉलच्या टेरेसवर जाऊन बसला. यानंतर लोकांनी गेस्ट हाऊसचे चॅनेल गेट बंद केले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. अखेर रात्रभर अथक प्रयत्न केल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान बिबट्याने एका वन अधिकाऱ्याला जखमी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;