तेजस विमानांना विलंब, एचएएलवर विश्वास उरला नाही; हवाई दल प्रमुख भडकले
हिंदुस्थानच्या हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी लढाऊ विमानांच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली. या प्रकरणी हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडवर (एचएएल) विश्वास नसल्याचे वक्तव्य केले.
बंगळुरू एअर शोदरम्यान ए. पी. सिंग यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना तेजसच्या वितरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. हवाई दलाला अद्याप लढाऊ विमाने मिळालेली नाहीत. यासंदर्भात हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडकडून ‘होईल, मिळेल’ असे उत्तर नेहमी मिळते. एचएएल ही आपली स्वतःची कंपनी आहे. आम्ही तिथे काम केले आहे. मला असे वाटतंय की आम्ही मिशन मोडमध्ये नाही. सर्वांनी आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे.
एचएएलचा खुलासा
एचएएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीके सुनील यांनी विमानांच्या डिलिव्हरीला तांत्रिकी समस्येमुळे विलंब होत असल्याचा खुलासा बुधवारी केला. लवकरच हवाई दलाला तेजस देण्यास सुरुवात करू, असेही त्यांनी म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List