मोफत रेशन आणि पैसे मिळतात, मग लोकं कामं का करतील? मोफतच्या योजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

मोफत रेशन आणि पैसे मिळतात, मग लोकं कामं का करतील? मोफतच्या योजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

‘मोफत ते पोषक’ अशी जनभावना सर्वत्र निर्माण झाली आहे. ही परिस्थिती अंत्यत दुर्दैवी आहे. जनतेला मोफत रेशन आणि पैसे मिळतात, मग ते काम का करतील, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. अनेक मोफतच्या योजनांवरून सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना चांगलेच फटकारले आहे. शहरी भागातील बेघर लोकांच्या निवाऱ्याच्या अधिकाराशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने परखड मत नोंदवले आहे. निवडणुकीपूर्वी अनेक वस्तू, रेशन आणि पैसे देण्याच्या घोषणांमुळे लोक काम करणे टाळतात कारण त्यांना मोफत रेशन आणि पैसे मिळतात, असे मत न्यायालयाने नोंदवत मोफतच्या घोषणा करणाऱ्या राजकीय पक्षांना चांगलेच फटकारले आहे.

सर्वोच्च न्यायालयात बुधवारी शहरी दारिद्र्य निर्मूलन योजनेच्या प्रकरणाबाबत सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, मोफत देणग्यांमुळे लोक काम टाळत आहेत. लोकांना कोणतेही काम न करता पैसे मिळत आहेत. अशा योजनांमुळे अनेक लोकांची काम करण्याची वृत्ती नाही. सर्व मोफत मिळत असताना काम का कारायचे? अशी त्यांची भावना झाली आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. शहरी भागातील बेघर लोकांच्या निवाऱ्याच्या अधिकाराशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या योजनांच्या दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. अनेक राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी मोफत देणग्यांच्या घोषणा करतात. त्यामुळे लोकांना रेशन आणि पैसे मिळतात. त्यामुळे ते काम करणे टाळतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने म्हटले की, दुर्दैवाने, या मोफत देणग्यांमुळे लोक काम करण्यास करणे टाळतात. त्यांना मोफत रेशन मिळत आहे. कोणतेही काम न करता पैसे मिळत आहेत. या योजनेतील बेघर लोकांबाबत होणाऱ्या प्रयत्नांची आम्हाला जाणीव आहे. मात्र, अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केल्यास त्याचा चांगला पिकणाम दिसेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

अ‍ॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी खंडपीठाला सांगितले की, केंद्र सरकार शहरी दारिद्र्य निर्मूलन मोहिमेला अंतिम स्वरूप देण्याच्या प्रक्रियेत आहे. शहरी दारिद्र्य निर्मूलन अभियान प्रभावी होण्यासाठी किती वेळ लागेल याची पडताळणी केंद्राकडून करावी, असे खंडपीठाने अॅटर्नी जनरलना सांगितले. या प्रकरणाची सुनावणी आता सहा आठवड्यांनी करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;