हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली राजकीय दलाली आहे, संजय राऊत कडाडले

हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली राजकीय दलाली आहे, संजय राऊत कडाडले

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होत आहे. त्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी संमेलनाच्या आयोजकांना फटकारले आहे. ”कोणाला कसेही सत्कार देताय, यांचा साहित्याशी संबंध काय आहे, हे मराठी साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

”हे मराठी साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली आहे. कोणालाही कसेही पुरस्कार देतायत. कोणचे कसेही सत्कार करतायत. यांचा साहित्याशी संबंध काय? माझा आयोजकांना प्रश्न आहे तुम्ही दिल्लीत दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करताय. भाजपचा हा उपद्व्याप आहे. इथे मराठीची काय सेवा करणार आहात. महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्या लोकांचा सत्कार करतायत त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

“‘साहित्य संमेलनाला पैशांची कमी असेल. जर त्यांनी अशा पद्धतीने पैसे गोळा करण्यापेक्षा महाराष्ट्राकडे यायचं होतं. मराठी माणसाने लोकवर्गणी करून पैसे दिले असते. शिंद्यांच्या नावाने पुरस्कार विकले गेले आहेत. मराठीचा एवढा घोर अपमान दिल्लीच्या राजकारणात पाहिला नव्हता, असं संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;