10 किलोमीटर पायपिटीनंतरच कुंभस्नान, प्रयागराजमध्ये भाविकांचा कोंडमारा; शहरात वाहनांना बंदी

10 किलोमीटर पायपिटीनंतरच कुंभस्नान, प्रयागराजमध्ये भाविकांचा कोंडमारा; शहरात वाहनांना बंदी

माघी पौर्णिमेनिमित्त प्रयागराजमध्ये पुन्हा भाविकांचा महासागर उसळला असून त्यांचा अक्षरशः कोंडमारा झाला आहे. आधीच रस्ते जाम होऊन लाखो भाविक वाहतुककोंडीत अडकून पडल्याने त्यात आणखी भर पडू नये म्हणून संपूर्ण प्रयागराज शहरच नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी रात्री प्रयागराजमधील परिस्थितीचा आढावा घेतला आणि कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होता कामा नये असे आदेश पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, कल्पवास करणाऱ्या भाविकांनाही वाहनाने शहरात प्रवेश करता येणार नाही.

नवीन वाहतूक योजना लागू करण्यात आली असून भाविकांना त्यांची वाहने शहराबाहेर पार्क करावी लागतील. तर ट्रेनने येणाऱ्या भाविकांना रेल्वे स्टेशन परिसरात उतरून 8 ते 10 किलोमीटर पायी चालत संगमतटापर्यंत यावे लागणार आहे. माघी पौर्णिमेला अक्षयवट आणि लेटे हनुमान मंदिरही बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय व्हीव्हीआयपी पासही रद्द करण्यात आले आहेत.

पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत नो व्हेईकल

पहाटे चार वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाहनांना प्रयागराजमध्ये बंदी असणार आहे. केवळ आपत्कालीन आणि जीवनावश्यक सेवांसाठीच्या वाहनांना तसेच प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या वाहनांना शहरात प्रवेश असेल असे राज्य सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. माघी पौर्णिमेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

चार पिढय़ांसह अंबानींचे गंगास्नान

आशिया खंडातील सर्तवा श्रीमंत क्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आज कुटुंबीयांसह त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासह त्यांच्या मातोश्री कोकिलाबेन, मुले आकाश आणि अनंत, सुना श्लोका आणि राधिका, नातवंडे पृथ्वी आणि वेदा, मुकेश अंबानी यांची बहिण दीप्ती साळगावकर आणि नीना कोठारी यांनी पवित्र स्नान केले. अंबानी कुटुंबातील 4 पिढय़ांनी एकाचवेळी संगमावर पवित्र स्नान केले आणि गंगा मातेची पूजा केली.

कुठल्या स्टेशनपासून किती चालावे लागणार

प्रयागराज जंक्शन- 12 किलोमीटर, संगम प्रयाग स्टेशन- 6, प्रयाग स्टेशन-7, दारागंज स्टेशन-3 , रामबाग स्टेशन-8, नैनी स्टेशन-12, सुभेदारगंज स्टेशन-15, फाफभाऊ स्टेशन-8, छिक्की स्टेशन-16

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;