मोदींच्या ‘लखपती दीदी’साठीच लाडकी बहीण महायुतीला सवतीची

मोदींच्या ‘लखपती दीदी’साठीच लाडकी बहीण महायुतीला सवतीची

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांची मते मिळवून महायुती बहुमताने सत्तेवर आली. मात्र आता खुर्ची मिळाल्यानंतर ही योजनाच बंद करण्याची सरकारची कारस्थाने सुरू आहेत. तिजोरीवरील भाराबरोबर त्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. पण त्यामागची खरी गोम वेगळीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘लखपती दीदी योजना’ रेटण्यासाठीच महायुतीला लाडकी बहीण सवतीची झाल्याचे सांगितले जात आहे.

‘लखपती दीदी योजना’ ही पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना ‘लखपती दीदी’  म्हटले जाते. राज्यात एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प मोदींच्या आदेशावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोडला आहे.

बीकेसी येथे आयोजित ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन- 2025’ चे उद्घाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. राज्यभरातील बचत गटांकडून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यांत दहा आलिशान मॉल उभारण्याची घोषणा यावेळी केली. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ‘लाडकी बहीण योजना’  बंद करून त्या योजनेचा निधी लखपती दीदींसाठी वळवायचा आणि  मोदींची योजना यशस्वी करायची असे फडणवीसांचे नियोजन असल्याची चर्चा आहे.

मार्चपर्यंत 25 लाख महिलांना लखपती करण्याचे टार्गेट

राज्यात सध्या 11 लाख लखपती दीदी आहेत. मार्चपर्यंत 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा फडणवीस यांचा मानस आहे. राज्याच्या तिजोरीवर दोन लाख कोटींचा बोजा असल्याने त्या परिस्थितीत ही योजना वेगाने पुढे नेता येणे अशक्य आहे. त्यामुळेच ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची संख्या काही ना काही कारणांवरून कमी करत तो निधी ‘लखपती दीदी’साठी वळवण्याचे महायुती सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;