38th National Games – माऊंटन बायकिंगमध्ये महाराष्ट्राच्या लेकींचा विजयी धमाका; प्रणिताला सुवर्ण, ऋतिकाला रौप्य

38th National Games – माऊंटन बायकिंगमध्ये महाराष्ट्राच्या लेकींचा विजयी धमाका; प्रणिताला सुवर्ण, ऋतिकाला रौप्य

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात ऋतिका गायकवाडने रूपेरी यश संपादन केले आहे. निसर्गरम्य उत्तराखंडच्या सातताल डोंगरदर्‍यातील खडकाळ मार्गावरील सात फेर्‍यांची शर्यत प्रणिता सोमणने एक तास 22 मिनिटे 10.818 सेकंदात पूर्ण केली. तिची सहकारी व नाशिकची खेळाडू ऋतिका गायकवाड हिने कांस्यपदक जिंकताना हेच अंतर एक तास 27 मिनिटे 5.623 सेकंदात पार केले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच माउंटन बाईकिंग या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. प्रणिता हिने क्रॉस कंट्री टाईम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. टाईम ट्रायल मधील अव्वल यशामुळे आज तिने अतिशय आत्मविश्वासाने ही शर्यत जिंकली. टाईम ट्रायल शर्यतीप्रमाणे आजही तिला कर्नाटकची आंतरराष्ट्रीय सायकलपटू स्टार नरझरी हिचे आव्हान होते. मात्र, प्रणिता हिने तिला कसे मागे ठेवायचे याचे योग्य नियोजन करून सलग दुसर्‍या सुवर्णयशाला गवसणी घातली.

टाईम ट्रायलमध्ये काल सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला होता. आज त्याचा फायदा घेत अन्य स्पर्धकांवर मात करुन माझे सहकारी ऋतिका हिला कास्यपदक मिळाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे, असे प्रणिता हिने सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदक मिळवण्याचे माझे ध्येय साकार झाल्यामुळे मला खूपच समाधान वाटत आहे. त्यातही प्रणिता या माझ्या सहकारी खेळाडू बरोबर पदकाच्या व्यासपीठावर उभे राहण्याची संधी मिळाली याचा आनंद मोठा असल्याचेे ऋतिकाने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;