पालकांनो मुलांना वेळ देता येत नाहीये का! मुलांसोबत ‘या’ गोष्टी करून बघा

पालकांनो मुलांना वेळ देता येत नाहीये का! मुलांसोबत ‘या’ गोष्टी करून बघा

प्रत्येक पालकांना मुलांना  क्वालिटी टाईम देणे शक्य नसते. परंतु काही साध्यासोप्या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकाल. आजकाल धकाधकीच्या जीवनशैलीत आपण सर्वचजण तारेवरची कसरत करत असतो. अशावेळी अनेकदा आपण लहान मुलांना वेळ देण्यात कमी पडतो. आई-वडील दोघेही नोकरीला जाणारे असतील तर मुलांसाठी वेळ काढणं मुश्किल होतंय. मुलांमधील आणि पालकांमधील संवाद हरवत चालल्यामुळे मुले एकाकी पडू लागली आहेत. त्यामुळेच पालकांनी मुलांना वेळ देणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. 
 
सध्याच्या घडीला आई वडिल हे दोघेही कामावर जात असल्याने, त्यांना मुलांसाठी वेळ देणं हे खूप कठीण झालेले आहे. अशावेळी मुलांना समजून घेणं तर सोडाच, त्यांच्याशी साधा नीट संवादही साधता येत नाहीये. मुलांना वेळ देताना पालकांची दमछाक होऊ लागली आहे. या सर्व घडामोडीत मुलं एकाकी पडू लागली आहेत. त्यामुळेच आता मुलांच्या प्रश्नांवर पालकांनी आता जागृत होणं हे खूप गरजेचे आहे.
मुलांसोबत क्वालिटी टाइम घालविण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात हे जाणुन घेऊया. 
 
घरात असताना मुलांसोबत वेळ घालवा. पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर कमी करा. त्यामुळे मुलं तुम्हाला त्यांनी दिवसभरात केलेल्या गोष्टी मनमोकळेपणाने सांगू शकतील. 
 
सुट्टीच्या दिवशी गरज असेल तरच घराबाहेर पडा. जेवढे शक्य होईल तेवढे तुमच्या मुलांसोबत खेळा. त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना बोलते करा. 
 
तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमच्यासोबत तुमच्या मुलांनाही सहभागी करून घ्या.
तुमच्यासोबत मुलांनाही मॉर्निग वॉकसाठी बाहेर घेऊन जा. त्यामुळे त्यांना चांगल्या सवयी लागतील. तसेच त्यांचे आरोग्य उत्तम राहील. शिवाय तुम्ही एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू शकाल.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;