विज्ञान भवनात पंतप्रधानांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन, दिल्लीत तीन दिवस मराठीचा जागर

विज्ञान भवनात पंतप्रधानांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन, दिल्लीत तीन दिवस मराठीचा जागर

98 वे  मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन  21 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 4 वाजता विज्ञान भवन येथे होईल. सुरक्षेच्या कारणामुळे विज्ञान भवनामध्ये केवळ निमंत्रितांनाच उपस्थित राहता येईल. संमेलनाची कार्यक्रम पत्रिका आज साहित्य महामंडळाने जाहीर केली.

21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रंथदिंडीची सुरुवात होईल. उद्घाटन समारंभाचे दुसरे सत्र सायंकाळी 6.30 वाजता तालकटोरा स्टेडियममध्ये होईल. या सत्रात विद्यमान अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे व नियोजित अध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर यांची अध्यक्षीय भाषणे होतील.  उद्घाटन समारंभानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन मुख्य मंडपात होईल.  22 फेब्रुवारी- मुख्य मंडपात सकाळी 11 वाजता ‘मराठी पाऊल पडते पुढे’ परिसंवाद होणार आहे.  दुपारी 12.30 वाजता ‘मराठीचा अमराठी संसार’ या विषयावर अन्य भाषक सहचारी/सहचारिणी असलेल्या व्यक्ती आपले सहजीवन उलगडून दाखवतील.

23 फेब्रुवारी –  मुख्य सभागृहात ‘असे घडलो आम्ही’  परिसंवाद तर दुपारी 12 ते 2 ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य’ यावर चर्चासत्र होईल. दुसऱ्या मंडपात सकाळी 10 वाजता ‘अनुवाद-मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत’ यावर वत्ते आपली मते मांडतील. दुपारी 12 वाजता ‘पृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. दुपारी 4.30 वाजता संमेलनाचा समारोप होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;