शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवायचीय! मग ‘हा’ पदार्थ आहारात न विसरता समाविष्ट करा

शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवायचीय!  मग ‘हा’ पदार्थ आहारात न विसरता समाविष्ट करा

आपल्या जेवणामध्ये दही दुधाचा समावेश असणे हे निरोगी राहण्याचे लक्षण आहे. दही म्हणजे प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत्र. दह्यामध्ये बी-6 आणि बी-12 यांचे प्रमाण खूप असते. यामुळेच आपल्याला गॅस आणि अपचन या समस्यांपासून सुटका होते. दही पचनक्रिया सुधारण्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय आहे. दह्यामुळे आपल्या तोंडातील अल्सर बरे होण्यास मदत होते. दह्यामुळेच आपला रक्तदाब नियंत्रित राहतो. दुधापासून तयार होणारे अनेक पदार्थ आहे. त्यातले दही हे आपल्या घरात रोज असते. त्यामुळे घरात सहज उपलब्ध असलेला हा पदार्थ

आपण आहारातही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. दह्यापासून आपण अनेक पदार्थ करून आपल्या जेवणाची लज्जत वाढवू शकतो.

दही रोजच्या आहारात असणे म्हणजे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. दही आपल्या शरीरामध्ये अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. यामुळेच झोप न येण्याची तक्रारही दूर होते. दही आहारात आपण अनेक प्रकारे घेऊ शकतो. आपण नुसते दही खाऊ शकतो. किंवा दह्यापासून कढी, ताक असे विविध प्रकारही आपण करु शकतो. यामुळे दही आपल्या पोटात जाण्यासही मदत होते. दही वापरुन आपण अनेक प्रकारच्या कोशींबिरी करु शकतो. तसेच नुसते साखर घालूनही दही खाण्याची एक वेगळीच मजा आहे.

आता दही खाण्यासोबत केसांनाही अतिशय पोषक आहे. केसांना दही लावल्यामुळे एक अनोखी चकाकी केसांना प्राप्त होते. म्हणूनच अनेकदा मेहंदी भिजवताना ती दह्यामध्ये भिजवली जाते. केसांना दही लावल्यामुळे कोंडा नष्ट होण्यास मदत होते. तसेच केसांना उत्तम चकाकीही येते. दही लावल्यामुळे केसही मुलायम होतात.

(वरील कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;