मुलगी पाय घसरून तलावात पडली, वाचवायला गेलेल्या आई आणि भावासह पाच जणांचा मृत्यू

मुलगी पाय घसरून तलावात पडली, वाचवायला गेलेल्या आई आणि भावासह पाच जणांचा मृत्यू

बकऱ्या चारून सायंकाळी घरी परतत असताना मुलगी पाय घसरून तलावात पडली. मुलीला वाचवण्यासाठी आई आणि भावाने पाण्यात उडी घेतली. त्यानंतर गावातील अन्य दोन मुलांनी उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण तलावात बुडून मृत्यू पावले. गुजरातमधील पाटण जिल्ह्यात ही धक्कादायक घडली.

पाटणा तालुक्यातील वडावली गावात राहणारे एकाच कुटुंबातील तीन सदस्य बकऱ्या चारायला गेले होते. त्यांच्यासोबत गावातील एक मुलगा आणि मुलगीही होते. सायंकाळी बकरी चारून सर्वजण घरी परतत होते. यादरम्यान एका मुलीचा पाय घसरून ती तलावात पडली. तिला वाचवण्यासाठी चौघांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तलावाजवळ चपला पाहून गावकऱ्यांना काहीतरी अघटित घडल्याचा अंदाज आला. त्यानंतर गावकऱ्यांनी तलावातून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले.सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;