नक्षलवाद्यांनी भाजप सरपंचपदाच्या उमेद्वाराची घरात घुसून केली हत्या, पत्नी समोरच संपवले

नक्षलवाद्यांनी भाजप सरपंचपदाच्या उमेद्वाराची घरात घुसून केली हत्या, पत्नी समोरच संपवले

नक्षलवाद्यांनी क्रुरतेची हद्दच पार केली आहे. किरंदुल अरणपूर येथील भाजपचे सरपंचपदाचे उमेदवार जोगा राम यांची नक्षलवाद्यांनी गळा चिरून हत्या केली आहे. अरणपूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर शेकडोंच्या संख्येने आलेल्या नक्षलवाद्यांनी ही हत्या केली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी आधी संपूर्ण गावाला घेराव घातला आणि नंतर सर्वांच्या घरातील लाईट बंद केल्या. त्यानंतर सरपंच जोगा यांच्या घरी पोहोचले, मात्र जोगा यांच्या पत्नीने दार उघडले नाही तेव्हा त्यांनी दरवाजा तोडून घरात घुसले आणि पत्नीसमोरच पतीची हत्या केली. जोगाच्या मुलाला दुसऱ्या खोलीत बंद केले होते. त्यावेळी 6 नक्षलवादी त्यांच्या घरात घुसले होते. त्यावेळी सरपंचाची पत्नी लक्ष्मीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण दोन नक्षलवाद्यांनी तिला बंदी बनवले होते. तर इतर 4 नक्षलवाद्यांनी जोगा यांची निर्घृण हत्या केली. जोगा गेल्या 25 वर्षांपासून अरणपूर पंचायतीचे सरपंच होते. अरणपूर पंचायतीत जेव्हा जेव्हा महिलांची जागा असायची तेव्हा त्यांची पत्नी निवडणूक लढवायची आणि जेव्हा ती जागा मोकळी व्हायची तेव्हा जोगा निवडणूक लढवायचे.

नक्षलवादी भेदरले असून  ते निष्पाप लोकांना मारत आहेत. बाहेरील नक्षलवादी या भागात आलेले नाहीत. हे स्थानिक नक्षलवाद्यांचे काम आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच नक्षलवाद्यांना पकडले जाईल असे दंतेवाडाचे पोलीस अधिक्षक गौरव रॉय यांनी सांगितले.

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;