स्वयंपाकघरातील काळी मिरी ही मसाल्यांची ‘राणी’ का आहे…वाचा काळ्या मिरीचे आरोग्यासाठी अदभूत फायदे

स्वयंपाकघरातील काळी मिरी ही मसाल्यांची ‘राणी’ का आहे…वाचा काळ्या मिरीचे आरोग्यासाठी अदभूत फायदे

आपल्या स्वयंपाकघरातील काळी मिरी ही गरम मसाल्यांमध्ये सर्वात उपयुक्त मानली जाते. म्हणूनच काळी मिरी ही मसाल्यांची राणी म्हणून ओळखली जाते. पुराणकाळापासून काळी मिरी ही असंख्य रोगांवर रामबाण इलाज मानली जाते. काळी मिरीमध्ये असणारे गुणधर्म कर्करोग रोखण्यासाठी खूपच उपयुक्त मानले जाते. काळ्या मिरी मध्ये कॅल्शियम, आयरन, फाॅस्फोरस, थाईमिन सारखे पोषक तत्व आढळतात.
शरीरावर येणारी सूज यावर काळी मिरी ही अतिशय गुणकारी मानली जाते. तसेच हृदय रोगावरही काळी मिरीचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
काळी मिरीचा वापर तुम्ही स्वयंपाकघरात विविध प्रकारच्या व्यजंनामध्ये करु शकतात. आता आपण बघूया काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे.
मलेरिया झाल्यावर काळी मिरी खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण मलेरियाच्या विषाणूंना रोखण्यासाठी काळी मिरी ही खूप गुणकारी मानली जाते.
दातदुखीवर काळी मिरी गुणकारी मानली जाते. म्हणूनच दात दुखीवर काळी मिरीची पावडर दाढेत ठेवली जाते. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा काळी मिरी ही उत्तम मानली जाते.
भूक कमी लागणे, अपचन तसेच श्वसनाच्या समस्यांवरही काळी मिरी ही लाभदायक मानली जाते.
खोकल्यावरही काळी मिरीची पावडर जेवणानंतर खाल्ल्यावर खोकला कमी होण्यास मदत होते.
काळी मिरीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए मुळे काळी मिरी ही कर्करोगापासून बचाव करण्यासाठी समृद्ध मानली जाते.
(वरील कोणतेही उपाय करताना आपण योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;