Delhi Election Result – अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतील, आतिशी यांचा विश्वास

Delhi Election Result – अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतील, आतिशी यांचा विश्वास

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून या निवडणुकीत आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू झाली. आम आदमी पक्ष विजयाचा चौकार मारतो की दिल्लीवर 27 वर्षांनंतर भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवतात हे स्पष्ट होईल. पोस्टल मतांमध्ये भाजपने बाजी मारली असून आता ईव्हीएमची मत कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सुरुवातीच्या कलांनुसार आम आदमी पार्टीचे तीन प्रमुख नेते पिछाडीवर आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर आहेत. एकीकडे मतमोजणी सुरु असताना दुसरीकडे मुख्यमंत्री आतिशी यांनी मात्र विजयाचा विश्वास व्यक्त केला. अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होतील, असेही त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

ही निवडणूक साधीसुधी नव्हती. चांगले विरुद्ध वाईट, काम आणि गुंडगिरी अशी ही निवडणूक झाली. मला पूर्ण विश्वास आहे की कालकाजी मतदारसंघातील आणि संपूर्ण दिल्लीतील लोक आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभे राहतील, असे आतिशी म्हणाल्या. आपला बहुमत मिळेल आणि अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही आतिशी यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;