खेळ महोत्सवात बुद्धिबळ, कॅरमचा धडाका; उद्यापासून धारावी-दादरमध्ये स्पर्धांचे आयोजन

खेळ महोत्सवात बुद्धिबळ, कॅरमचा धडाका; उद्यापासून धारावी-दादरमध्ये स्पर्धांचे आयोजन

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित खेळ महोत्सवात 8 आणि 9 फेब्रुवारीला धारावी आणि वडाळा विधानसभा क्षेत्रात महिला क्रिकेट, बुद्धिबळ आणि कॅरम या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांची क्रिकेट स्पर्धा धारावी येथील मनोहर जोशी महाविद्यालयात 9 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे.  या स्पर्धेसाठी विजेत्या संघाला 30,000 रुपये, तर उपविजेत्यांना 15,000 रुपयांचे इनाम दिले जाणार आहे. तसेच सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही रोख पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

त्याचप्रमाणे रविवारीच दादर येथील शारदा मंगल कार्यालयात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दोन सत्रांमध्ये विभागण्यात आल्या असून सकाळच्या सत्रात 6, 8, 10, 12 आणि 14 वर्षांखालील गट सहभागी होतील, तर दुपारच्या सत्रात 7, 9, 11, 13, 15 वर्षांखालील गट आणि खुला गट (पुरुष व महिला) खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेत विजेत्यांनाही रोख पुरस्काराने गौरविले जाणार आहे. याच सभागृहात कॅरम स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. खेळ महोत्सवात आयोजित स्पर्धा फक्त दक्षिण-मध्य मुंबई विभागातील म्हणजेच अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, शीव-कोळीवाडा, वडाळा आणि माहीम येथील खेळाडूंसाठी मर्यादित आहे. या स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी दिलीप पाणिग्रही (9769113120) आणि पवनराज महाडिक (9152167560) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;