वेब न्यूज – जगभरातील धोकादायक नद्या

वेब न्यूज – जगभरातील धोकादायक नद्या

>> स्पायडरमॅन

सोशल  मीडियावर सध्या सर्वात जास्त चर्चिला जात असलेला विषय म्हणजे कुंभमेळा होय. कुंभमेळ्याच्या निमित्ताने हिंदुस्थानी सभ्यता, चालीरीती, परंपरा यांच्या जोडीने गंगा नदीदेखील चर्चेत आली आहे. गंगेचे महात्म्य, तिचे पुराणातील स्थान, तिचे शुद्ध पाणी याविषयी अनेक जण माहिती देत असताना, एका बाजूला गंगेसारख्या शांत नद्या जगात आहेत तिथेच काही धोकादायक नद्यादेखील आहेत अशी एक चर्चा सुरू झाली आहे. अनेक जण अशा धोकादायक नद्यांविषयीची माहिती देत आहेत.

पाणी हे मानवासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्राचीन काळात अनेक नागरी सभ्यतांचा उगम हा नदीकिनारी झाल्याचे दिसून येते. मात्र शांतपणे वाहणाऱ्या, मानवी जीवनास अनुकूल अशा नद्यांच्या सोबत काही मानवासाठी धोकादायक अशा नद्यादेखील जगात आहेत. कांगो नदी ही आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे. या नदीला जगातील सर्वात खोल नदी म्हणूनदेखील ओळखले जाते. या धोकादायक नदीमध्ये मगरी आणि हिप्पोपोटॅमस मोठय़ा संख्येने आढळतात. मिसिसिपी ही उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठी नदी मानली जाते. मानवी जीवनासाठी धोकादायक असलेल्या अनेक प्राण्यांचा या नदीत रहिवास आहे. सर्वात गंभीर म्हणजे या नदीचे पाणी अत्यंत प्रदूषित आहे. जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.

भारत, चीन आणि बांगलादेशमधून वाहणारी ब्रह्मपुत्रा नदीदेखील तिच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे धोकादायक मानली जाते. ही नदी अनेकदा पुराचा धोका निर्माण करते आणि मानवी जीवनाबरोबरच संपत्तीचीदेखील हानी करते. नील नदी ही आफ्रिकेतील सर्वात मोठी नदी आहे. या नदीमध्ये मगरी आणि विषारी साप यांची संख्या लक्षणीय आहे. याचबरोबर या नदीमध्ये अनेक प्रकारचे धोकादायक सूक्ष्मजीवदेखील आढळून येतात. शनय टिम्पिश्का या नदीला अॅमेझॉनची उकळती नदी म्हणून ओळखले जाते. भूमिगत ज्वालामुखींमध्ये होत असलेल्या हालचालींमुळे या नदीचे पाणी असे गरम आहे असे संशोधक सांगतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;