खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या काकांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जण जखमी
On
धाराशिव येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या काकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. ओमराजे निंबाळकर यांचे काका बाबा पाटील यांच्या कारला एका पिकअप ट्रकने धडक दिल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर -उमरगा महामार्गावरील नारंगवाडी तलाव परिसराजवळ हा अपघात झाला. पाटील यांच्या कारच्या एअर बॅग उघडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात पाच जण जखमी झाले आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List