Nanded News – गार्गीताई उर्फ वसूमती देशपांडे निधन

Nanded News – गार्गीताई उर्फ वसूमती देशपांडे निधन

संतकवी श्री सद्गुरू दासगणू महाराज संस्थान येथील परम पुज्य स्वामी वरदानंदजी भारती यांच्या मानस कन्या गार्गीताई उर्फ वसूमती दिनकरराव देशपांडे (75) यांचे आज सकाळी उत्तरकाशी येथे निधन झाले.

गोरठे येथे परम पुज्य स्वामी वरदानंदजी भारती यांच्या सहवासात प्रदीर्घ काळ राहिलेल्या अभ्यासू, कडक शिस्तीच्या पण प्रेमळ स्वभावाच्या वसूताईचे आज दुःखद निधन झाले. गोरठे येथे प्रदीर्घ काळ संतश्री दासगणू महाराज संस्थान  येथे त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा दिली. त्यांच्या किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून अनेक जण मंत्रमुग्ध होत. लहान बालकावर तसेच युवा पिढीवर संस्कार करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. दोन वर्षापूर्वी त्या गोरठे सोडून उत्तरकाशी येथे वास्तव्यास गेल्या होत्या. त्यावेळी हजारो भाविकांनी व भक्तांनी त्यांना साश्रूनयनांनी निरोप दिला होता. मध्यंतरीच्या काळात एक दोनवेळेस त्या गोरठे येथे आल्या होत्या. शिस्त-सेवा-नित्यनेम याचे अचरण करत त्यांनी नावलौकीक मिळविला. देशभरातून विविध भक्तगण त्यांचे चाहते होते. त्यामुळे त्यांच्या या देशभरातील परिवारातील आधाराचे मोठे छत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे संपूर्ण जीवन परमार्थासाठी आदर्श होते. मुला-मुलींवर उत्तम संस्कार करुन त्यांनी मार्गदर्शन केले. वरदानंद भारती यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयुष्य वाहून दासगणू परिवाराचे गोरठे येथील व्यवस्थापन समर्थपणे त्यांनी सांभाळले. कडक शिस्त त्यांनी आपल्या आयुष्यात बाळगली होती.

आज पहाटे कैलास आश्रम, उत्तरकाशी येथे त्यांचे दुःखद निधन झाले. उद्या सकाळी (08 फेब्रुवारी 2025) दहा वाजता उत्तरकाशी येथे भागिरथी नदीच्याकाठी श्री गंगाकिनारी केदारघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सबंध महाराष्ट्रातून अनेक भक्तगण उत्तरकाशीकडे रवाना झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातून श्री दासगणू प्रतिष्ठाणचे अध्यक्ष महेशअण्णा आठवले, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, गोविंद नलबलवार, जालिंदर देशपांडे, नरसिंग मुक्कावार, मनोज कोडगिरे, अशोक मामीडवार, शिवा गोडगे, सुभाषराव देशमुख, शिरीषराव देशमुख, बालाजी सावंत, विमलताई सावंत, बालाजी येरावार आदी आज उत्तरकाशीकडे रवाना झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;