कोटक महिंद्राच्या उदय कोटक यांनी मालमत्तेसाठी केला देशातील महागडा सौदा; किंमत वाचून तुम्हीही अवाक् व्हाल..

कोटक महिंद्राच्या उदय कोटक यांनी मालमत्तेसाठी केला देशातील महागडा सौदा; किंमत वाचून तुम्हीही अवाक् व्हाल..

हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत बँकर तसेच कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबईतील वरळी परिसरात 202 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. Zapkey.com ने दिलेल्या माहितीनुसार, शिवसागर निवासी संकुलात 202 कोटी रुपयांना सी फेसिंग अपार्टमेंटस् खरेदी केले आहेत.
मुंबईतील वरळी सी फेसिंग असलेल्या मालमत्तांची किंमत कोट्यवधींच्या घरात असून, या विभागात घर घेणं हे अनेक प्रतिष्ठितांचे स्वप्न असते. उदय कोटक आणि कुटुंबाने वरळीमध्ये सी फेसिंग 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 12  मालमत्ता खरेदी केल्या आहे. या मालमत्तांचा प्रति चौरस फूट 2.71 लाख इतका दर आहे. कागदपत्रांनुसार, या व्यवहारांमध्ये त्यांची पत्नी पल्लवी कोटक, त्यांची मुले जय आणि धवल कोटक आणि त्यांचे पालक सुरेश आणि इंदिरा कोटक यांनी केलेल्या खरेदीचाही समावेश आहे.
उदय कोटक यांनी घेतलेली ही मालमत्ता चौरस फुटांचा विचार केल्यास, आत्तापर्यंत देशभरातील विक्री झालेल्या मालमत्तांमधील सर्वाधिक रक्कम आहे. शिवसागर ही इमारत समुद्राच्या समोर असल्यामुळे, वरळी परिसरातील हा विभाग पाॅश मानला जातो. याठिकाणी अनेक नामांकित सेलिब्रिटी राहतात.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;