Green Tea चे अतीसेवन शरीरासाठी धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

Green Tea चे अतीसेवन शरीरासाठी धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

Green Tea (ग्रीन टी) पिण्याचे अनेक फायदे आहेत पण त्यासोबतच अनेक तोटे देखील आहेत. अशा परिस्थितीत, Green Tea चे सेवन किती प्रमाणात हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कधीकधी जास्त प्रमाणात Green Tea प्यायल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने त्वचेवर अ‍ॅलर्जी होऊ शकते. ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने पचनाच्या समस्या जसे की पित्त, गॅस आणि पोटदुखी यांसारखे आजार उद्भवू शकतात . त्यामुळे Green Tea चे सेवन प्रमाणात करावे अन्यथा ही सवय तुमच्या पोटासाठी धोकदायक ठरू शकते.

चहा किंवा कॉफीप्रमाणेच Green Tea मध्येही कॅफीन असते. दिवसभर कॅफीनचे जास्त सेवन केल्याने डोकेदुखी, आळस, चिंता, चिडचीड यासह अन्य हानिकारक दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. त्यामुळेच Green Tea चे सेवन  प्रमाणात करणे आवश्यक आहे.

लोहाचे शोषण कमी

Green Tea चे जास्त सेवन केल्याने शरीरात लोहाचे शोषण कमी होते. Green Tea मध्ये पॉलीफेनॉल असतात, जे लोहाचे शोषण कमी करू शकतात.

दातांच्या समस्यांना आमंत्रण

Green Tea मध्ये टॅनिन असते, जे दात खराब करू शकतात आणि दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

उच्च रक्तदाबासारख्या समस्या

Green Teaचे जास्त सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

झोप उडेल

तसेच Green Tea चे जास्त सेवन केल्याने झोप न येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

(वैद्यकीय सल्ला: कोणतेही प्रयोग करण्यापूर्वी ते आपल्या फॅमेली डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञांना विचारून करणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;