अहिल्यानगरहून अखेर बीडला रेल्वे पोहोचली, विघनवाडी ते बीड चाचणी यशस्वी

अहिल्यानगरहून अखेर बीडला रेल्वे पोहोचली, विघनवाडी ते बीड चाचणी यशस्वी

नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग प्रकल्पांतर्गत विघनवाडी ते बीड या 30 कि. मी. अंतराची चाचणी यशस्वीपणे पार पडली. या चाचणीत ताशी 130 कि. मी. वेगाने रेल्वे धावली. नगर ते बीडपर्यंत लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास सोपा व सुखकर होणार आहे. मराठवाड्यातील प्रवाशांची प्रतीक्षा आता संपली आहे.

या सर्व लोहमार्गामध्ये डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांपासून या रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी नगर ते नारायणडोह, नारायणडोह ते सोलापूरवाडी, सोलापूरवाडी ते आष्टी, आष्टी ते अंमळनेर, अंमळनेर ते विघनवाडी या मार्गांची चाचणी घेण्यात आली होती. आता काल (दि. 5) विघनवाडी ते बीड या 30 किलोमीटर रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली.

आता एकूण 165 किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच ताशी 130 कि.मी. वेगाने धावली रेल्वे या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गामध्ये महत्त्वाचे म्हणजे या रेल्वेमार्गावर अनेक मोठे पूल बांधण्यात आले. त्यासाठी मोठे तांत्रिक कौशल्य वापरून दक्षिण रेल्वेवरील सर्वात मोठा गल्डर टाकून रेल्वे रूळ अंथरण्यात आले आहेत. 300 मीटर लांबीचे व 18 मीटर उंचीचे मोठे पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्या धावण्यासाठी लोहमार्गाला बळकटी मिळाली आहे. बीड ते परळीपर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास काही कालावधी लागू शकतो. तसेच यावेळी रेल्वे ताशी 130 वेगाने धावली, अशी माहिती उपमुख्य अभियंता (बांधकाम) दत्तात्रय लोळगे यांनी दिली.

रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी ए. के. पांडे, मुख्य अभियंता राकेश कुमार यादव, उप मुख्य अभियंता (बांधकाम) दत्तात्रय लोळगे, कार्यकारी अभियंता एस. सुरेश, सिनियर सेक्शन इंजिनीअर विद्याधर धांडोरे, सिनियर सेक्शन इंजिनीअर सत्येंद्र रा. कुवर, सिनियर सेक्शन संजय श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;