रेल्वे स्थानकाजवळील वाहतूककोंडी फुटणार, हायकोर्टाचा गोरेगाव पूर्वेकडील रस्तारुंदीकरणाला हिरवा कंदिल

रेल्वे स्थानकाजवळील वाहतूककोंडी फुटणार, हायकोर्टाचा गोरेगाव पूर्वेकडील रस्तारुंदीकरणाला हिरवा कंदिल

गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळील (पूर्व) वाहतूककोंडी फोडण्यासाठी येथील रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. याला उच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. पूर्वेला आयटी पार्क आहे. नेस्को, नेरलॉनसह अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. रस्तारुंदीकरणामुळे येथील वाहतूक सुरळीत होऊ शकेल.

या रस्तारुंदीकरणासाठी कामा इस्टेट येथील दोन शौचालये तोडली जाणार आहेत. त्याविरोधात विश्वशांती उत्कर्ष संस्थेने जनहित याचिका केली होती. मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या दोन शौचालयांच्या बदल्यात दहा आसनी शौचालये बांधून दिली जातील, अशी हमी महापालिकेने न्यायालयात दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. परिणामी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

म्हाडाने दिला होता निधी

निर्मल भारत अभियान योजनेअंतर्गत या शौचालयाचे बांधकाम 2003-04 मध्ये झाले आहे. म्हाडाने यासाठी निधी दिला होता. यातील पाचपैकी दोन शौचालये तोडली जाणार आहेत. या दोन शौचालयांचा रस्तारुंदीकरणाला अडथळा होत आहे. शौचालये तोडल्यास नागरिकांची गैरसोय होऊ शकते. ही शौचालये तोडण्यास न्यायालयाने मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.  

महापालिकेचा दावा

गोरेगाव पूर्वेला आयटी हब आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पंपन्यांची ऑफिसेस येथे आहेत. नेस्को, नेरलॉन येथे आहे.  येथून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर सतत वाहतूककोंडी होते. येथील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्तारुंदीकरण केले जाणार आहे. याला येथील दोन शौचालयांचा अडथळा होत आहे. म्हणून ती तोडली जाणार आहेत. त्या बदल्यात जवळच नवीन दहा आसनी शौचालये बांधून दिली जातील, असे पालिकेने न्यायालयाला सांगितले.

एका महिन्यात शौचालयाचे काम पूर्ण करा

दहा आसनी शौचालयाचे बांधकाम एका महिन्यात पूर्ण करा, असे आदेशही न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;