मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या कनिष्ठ, उपअभियंता पदाच्या परीक्षा पारदर्शीपणे घ्या; अंबादास दानवेंची मागणी

मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या कनिष्ठ, उपअभियंता पदाच्या परीक्षा पारदर्शीपणे घ्या; अंबादास दानवेंची मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा या अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात,अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. या मागणीसाठी गुरुवारी अंबादास दानवे यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले.

मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी 9 फेब्रुवारी 2025 रोजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र तलाठी व परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटी झाली होती. त्याच एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. या परीक्षा अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी गुरुवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. तसेच या भेटीत दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोड येथील मुंबई महापालिकेची सीबीएसई शाळा व मुंबई पब्लिक शाळेमधील शिक्षकांची रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी सचिव साईनाथ दुर्गे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना केली.

साईबाबा म्युनिसिपल शाळा, लालबाग या शाळेच्या उभारणीचे काम तातडीने सुरू करावे, अशी सूचना माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना केली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव साईनाथ दुर्गे, माजी नगरसेवक सचिन पडवळ, इंजिनिअरिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश देशमुख, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;