विकी कौशल आणि कतरिना कशावरून भांडतात? कारण जाणून तुम्हालाही हसू येईल

विकी कौशल आणि कतरिना कशावरून भांडतात? कारण जाणून तुम्हालाही हसू येईल

विकी कौशल आणि कतरिना कैफ हे इंडस्ट्रीतील एक लाडकं आणि सतत चर्चेत राहणारं जोडपं आहे. ही जोडी सर्वांनाच खूप आवडते. कतरिना-विकी यांची पडद्यावर केमिस्ट्री दिसली नसली तरी पडद्याबाहेर खूप छान केमिस्ट्री आहे आणि हे अनेक कार्यक्रमांमधून, तसेच त्यांच्या फोटो व्हिडीओंमधून समोर येतच. सध्या विकी त्याच्या आगामी ‘छावा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

दरम्यान विकीचा कोणताही नवा चित्रपट येणार असले तेव्हा मुलाखतीत विकीला “कतरिनाला तुझ्या चित्रपटाचा ट्रेलर आवडला का?, कतरिनाची काय रिअॅक्शन आहे?” असे अनेक प्रश्न विचारण्यात येतात. विकी यावर मोकळेपणाने उत्तरही देतो. अशाच एका मुलाखती दरम्यान विकाला त्याच्या आणि कतरिनाच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं होतं. कतरिनासोबत कोणत्या गोष्टीवरून भांडण होतं असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.यावर विकीने अगदी मजेशीर उत्तर दिलं होतं.

‘कॉफी विथ करण’ शोमध्ये विकी कौशलचा खुलासा 

विकी कौशल सिद्धार्थ मल्होत्रासोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पोहोचले होते. यादरम्यान, त्याने कतरिनासोबतच्या त्याच्या भांडणाचा एक मजेदार किस्सा शेअर केला. खरंतर, रॅपिड फायर राउंड दरम्यान, करणने विकी कौशलला तो आणि कतरिना कशावरून भांडतात असा पश्न विचारला होता. मग विकी गमतीने म्हणाला, “आता कमी कमी होत चाललेल्या कपाटाच्या जागेसाठी. म्हणजेच वॉर्डरोबमधील जागेसाठी.”

विकी आणि कतरिना कशावरून भांडतात?

विकीने दिलेल्या या उत्तरावर करण जोहरने स्वतः हसून खुलासा केला की तो एकदा विकीच्या घरी गेला होता तेव्हा त्याच्याकडे कपाट ठेवण्यासाठी जागा नव्हती. यावर विकी म्हणाला , “त्याच्याकडे दीड खोली आहे आणि माझ्याकडे एक वॉर्डरोब आहे जो लवकरच ड्रॉवर बनू शकेल.” नंतर, करणने विकीला गरीब माणूस म्हणून संबोधून त्याचं सांत्वन केलं आणि कतरिनाचीही बाजू घेतली.

करण म्हणाला, “तिला तिच्या कपड्यांसाठी एवढी मोठी जागा लागते कारण ती शेवटी एक नायिका आहे.” हे ऐकल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्राही हसायला लागतो. दरम्यान मुलाखतीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी देखील यावर मजेशीर कमेंट केल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

2021 मध्ये विकी-कतरिनाची ​​लग्नगाठ

काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी लग्न केलं. लग्न होईपर्यंत दोघांनीही त्यांचे नाते उघड केलं नव्हतं. चाहते या जोडप्याला ‘विकॅट’ म्हणूनही ओळखतात. तथापि, आजपर्यंत दोघांनीही एकत्र कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही. पण या दोघांनी एकत्र काम करावं अशी चाहत्यांनी नक्कीच इच्छा आहे.

विकीच्या कामाबद्दल

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, विकी कौशलचा शेवटचा चित्रपट ‘बॅड न्यूज’ होता, ज्यामध्ये तो तृप्ती डिमरी आणि एमी विर्कसोबत दिसला होता. आता तो ‘छावा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना देखील आहेत. कतरिना कैफचे मागील चित्रपट ‘मेरी क्रिसमस’ आणि ‘टायगर ३’ होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;