उतार वयात उदित नारायण असंच वागणार! उर्फी जावेदची उदित नारायण यांच्यावर खोचक टिका

उतार वयात उदित नारायण असंच वागणार! उर्फी जावेदची उदित नारायण यांच्यावर खोचक टिका

गेल्या काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी भर कार्यक्रमात एका महिलेला किस केलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही, घडलेल्या घटनेवर उदित नारायण म्हणाले होते की, ” झालेल्या प्रकारामुळे मला लाज का वाटावी? जे घडलं ते वाईट किंवा सीक्रेट नव्हतं. असा खुलासा घडलेल्या घटनेनंतर उदित नारायण यांनी केला होता. घडलं असं होतं की, एका कार्यक्रमादरम्यान एक चाहती सेल्फी काढण्यासाठी त्यांच्याजवळ आली असता, उदित नारायण यांनी तिला किस केलं होतं. अवघ्या काही सेकंदातच उदित नारायण यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

उदित नारायण यांच्या कृत्यावर माॅडेल उर्फी जावेदने चांगलाच निशाणा साधला आहे. उर्फीने इंस्टंट बॉलिवूडशी संवाद साधला तेव्हा ती म्हणाली की, “किस किस को प्यार करूं मैं. किस किस को दिल दूं मैं… यानंतर ती म्हणाली, “पापा कहते हैं… तो पापा ही बडा नाम करेंगे. 69 वर्षाचे आहेत ना ते… आता त्यांचं वयच असं आहे… उतार वयात असंच होतं…” उर्फीच्या या वक्तव्यावर नेटकरीही भलतेच खुश झालेले आहेत. उतार वयात असंच होतं या उर्फीच्या वाक्यावर आता प्रतिक्रियांचा वर्षाव होऊ लागलेला आहे. 

उर्फी ही कायम तिच्या पेहरावामुळे चर्चेत राहिलेली आहे. उर्फी ही माध्यमांमध्ये स्पष्ट आणि तिच्या स्टाइलने बोलण्यावरुनही प्रसिद्ध आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;