लोणचं खा आणि निरोगी राहा!!! वाचा लोणच्याचे आपल्या आहारातील महत्त्व

लोणचं खा आणि निरोगी राहा!!! वाचा लोणच्याचे आपल्या आहारातील महत्त्व

गृहिणी घाई गडबडीत असल्यावर ती हमखास खिचडी भात किंवा डाळ खिचडी असा बेत करते. या डाळ खिचडीच्या जोडीला पापड किंवा लोणचं हे हमखास असतंच. अनेकांसाठी आजही वरण भात आणि लोणचं हा एक उत्तम पोटभरीचा पर्याय मानला जातो.

लोणचं करणं हा आपल्याकडे परंपरागत प्रथेचा भाग आहे. एक काळ होता, आपल्या घरातील काकी, आजी या लोणचं करण्यासाठी सरसावुन बसायच्या. आजही आपल्या धावपळीच्या युगात घरी लोणचं केलं नाही तरी, आपल्या किचनमध्ये लोणच्याची बाटली ही असतेच.  वरण भाताच्या जोडीला लोणचं खाण्याची प्रथा आपल्याकडे आज नाही. तर लोणच्याचं महत्त्व हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये फार पूर्वीपासून आहे. पूर्वीच्या काळी लोणचं करणं हा एक यथासांग कार्यक्रम असायचा. घरातील आजी, काकी लोणचं करताना तल्लीन होऊन करायच्या. लोणचं म्हणजे वर्षभराची बेगमी असायची. नानाविध लोणची ही आपल्या स्वयंपाकघरातील बरण्यांमध्ये विराजमान व्हायची.

लोणच्याचं आहारातलं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया. 

१. लोणचं हे आंबवलेले असल्यामुळे त्यात असलेल्या प्रोबायोटिक्समुळे आपल्या आतड्याचे आरोग्य उत्तम राखले जाते.

२. पचनसंस्था सुधारण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लोणचं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं.

३. व्हिटॅमिन सी हे लोणच्यामध्ये मुबलक प्रमाणात असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी लोणचं हे गुणकारी आहे.

४. रक्तातील साखरेची पातळी सुद्धा लोणचं खाण्यामुळे कमी राहण्यास मदत होते.

५. शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी लोणचं खाणं हा एक उत्तम पर्याय आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;