देशातील स्टार्टअपमध्ये महिलांची पॉवर वाढली

देशातील स्टार्टअपमध्ये महिलांची पॉवर वाढली

देशात अलिकडच्या काही वर्षात स्टार्टअपचे प्रमाण वाढलंय. महिलाही मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरू करताना दिसत आहेत. तब्बल 48 टक्के स्टार्टअप कंपन्यांमध्ये कमीत कमी एक तरी महिला संचालकपदावर असल्याचे एका अहवालातून समोर आलंय. महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने ही महत्त्वाची बाब मानली जात आहे.  1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाला. त्याच्या एक दिवस आधी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालानुसार, देशभरात डीपीआयआयटी मान्यताप्राप्त 152139 स्टार्टअप आहेत. त्यातील 73151 स्टार्टअप कंपन्यांमध्ये कमीत कमी एक महिला संचालक आहे. ही संख्या 48 टक्क्यांहून जास्त आहे.

देशातील मोठे स्टार्टअप आणि कंपन्यांची धुरा पुरुषांच्या हाती  असताना या क्षेत्रात महिलांचाही दबदबा दिसून येतोय. डिसेंबर 2024 मध्ये डीपीआयआयटीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सुरू झालेल्या 1.57 लाख स्टार्टअपपैकी सुमारे 73 हजार स्टार्टअप असे आहेत, ज्यामध्ये कमीतकमी एक महिला तरी संचालक आहे. हे सरकारमान्य स्टार्टअप आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;