13 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रवीण दराडे सहकार विभागात

13 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रवीण दराडे सहकार विभागात

सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून आज 13  सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पर्यावरण विभागातून बदली झाल्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण दराडे यांची बदली सहकार आणि पणन विभागात प्रधान सचिव म्हणून केली आहे.

पंकज कुमार यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागात सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी 2 म्हणून करण्यात आली आहे. नितीन पाटील यांची बदली नवी मुंबईत कौशल्य विकास विभाग आयुक्तपदी तर राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल यांची बदली अमरावती विभागीय आयुक्तपदी करण्यात आली असून डॉ. प्रशांत नारनवरे यांची बदली राज्यपालांचे सचिव म्हणून झाली आहे.

अनिल भंडारी माहिती-तंत्रज्ञान विभागाचे  संचालक, पी. के. डांगे राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव, एस. राममूर्ती राज्यपालांचे उपसचिव, अभिजित राऊत राज्य कर सहआयुक्त छत्रपती संभाजीनगर, मिलिंदकुमार साळवे अल्पसंख्याक विकास आयुक्त छत्रपती संभाजीनगर, अमित रंजन पांढरकवडा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची बदली नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून तर कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुख यांची बदली व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदी झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;