धनंजय मुंडे खूपच घोटाळेबाज, लफडेबाज

धनंजय मुंडे खूपच घोटाळेबाज, लफडेबाज

धनंजय मुंडे खूपच घोटाळेबाज, लफडेबाज असून तो राज्याला लागलेला दुर्दैवी डाग आहे. गोरगरीबांच्या ताटात माती कालवणे त्यांचा पिंड आहे.  इतका भ्रष्टाचार एक मंत्री करत असेल तर त्याला सरकार जवळ करते कसे, हा  मोठा प्रश्न आहे. सरकार जर कारवाई करणार नसेल तर जनतेला न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मीपण आता मागे लागणार आहे. मीपण सगळा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. मी सुट्टी घेऊन आता टप्प्याटप्प्याने कामाला लागणार असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले. धनंजय मुंडे  हे आरोपी फरार करायला फिरत आहेत. बाहेरचे आणि आतले आरोपी सांभाळताहेत. धनंजय मुंडे पुरावे नष्ट करण्यासाठी स्वतः काम करताहेत, असा दावाही मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला. धनंजय मुंडेंचीसुद्धा ईडी चौकशी लागली पाहिजे. हे पैसे कुठून आले? प्रॉपर्टी कुठून आली? कोणत्या योजनेत भ्रष्टाचार केलाय? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी  जरांगे-पाटील यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;