सैफ आणि अमृताच्या घटस्फोटानंतर लेक सारा आनंदी का झाली होती?

सैफ आणि अमृताच्या घटस्फोटानंतर लेक सारा आनंदी का झाली होती?

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला इंडस्ट्रीत येऊन आता 6 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. गेल्या काही वर्षांत, साराने अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि आता तिची तिच्या पालकांपासून स्वतंत्र ओळखही आहे.

साराने तिच्या मेहनतीच्या जोरावर आपली खास ओळख बनवली आहे. पण सारा वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांच्याबद्दल किंवा त्यांच्या घटस्फोटाबद्दल क्वचितच बोलते. पण एका मुलाखतीमध्ये सारा नक्कीच यावर मोकळेपणाने बोलली होती.

आईवडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर काय बदललं?

साराने 2021 मध्ये एका मासिकाला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने तिच्या बालपणीच्या काही आठवणी शेअर केल्या होत्या. साराने सांगितले होते की तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर ते दोघेही आनंदी होते.

साराला म्हणाली की, ‘मी माझ्या वयाच्या आधीच मोठी झाले आणि 9 वर्षांची असतानाच मला हे जाणवल की माझे पालक एकत्र राहूनही आनंदी नाहीत. घटस्फोटानंतर, माझ्या आईच्या चेहऱ्यावरच हास्यच गायब झालं, जे मला जवळजवळ 10 वर्षे लक्षात आलं नव्हतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ACKO (@ackoindia)


आईवडिलांचा घटस्फोटानंतर साराला आनंद का झाला होता?

सारा पुढे म्हणाली, ‘माझ्या आईचा स्वभाव गोड होता, पण काही वर्षांपासून तिने हसणेही बंद केले होते. हळूहळू ती नॉर्मल झाली आणि आनंदीही राहू लागली. वेगळे झाल्यानंतर माझे आईवडील खऱ्या अर्थाने अधिक आनंदी झाले असं मला वाटतं आणि हे पाहून मला फार आनंद झाला”. सारा पुढे म्हणाली की जेव्हा तिची आई तिच्यासोबत आणि तिच्या भावासोबत हसत खेळत राहते तेव्हा तेव्हा तिला ते आवडतं, पण लहानपणी तिला नेहमीच तिची आई गंभीर दिसायची ज्यामुळे साराला त्रास व्हायचा.

अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचा घटस्फोट कधी झाला?

सैफ आणि अमृता सिंग यांचे 1991 मध्ये लग्न झाले, त्यानंतर त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले झाली. 2004 मध्ये सैफ आणि अमृता यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. अमृता सिंगला मुलांचा ताबा मिळाला, पण सैफने मुलांचे संगोपन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, त्यामुळे दोन्ही मुले अजूनही सैफच्या जवळ आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा आणि इब्राहिमचा बॉलिवूड डेब्यू

सारा अली खानने 2018 मध्ये आलेल्या केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने ‘सिम्बा’, ‘कुली नंबर 1’, ‘लव्ह आज कल’ सारखे चित्रपट केले. साराचा आगामी चित्रपट मेट्रो आहे जो या वर्षी प्रदर्शित होऊ शकतो. त्याच वेळी, इब्राहिम अली खान ‘नादानियां’ या चित्रपटातून पदार्पण करत आहे आणि हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;