Mahakumbh 2025 चेंगराचेंगरीतील मृतांचा खरा आकडा सांगा, आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी लष्कराकडे द्या – अखिलेश यादव

Mahakumbh 2025 चेंगराचेंगरीतील मृतांचा खरा आकडा सांगा, आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी लष्कराकडे द्या – अखिलेश यादव

महाकुंभमेळ्यात (Mahakumbh 2025) मौनी अमावस्येच्या पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) 30 भाविकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ‘भाजप सरकार चेंगराचेंगरीतील मृतांचा खरा आकडा लपवतेय, असा गंभीर आरोप केला आहे.

संसदेचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बोलताना अखिलेश यादव यांनी भाजप सरकार सडकून टीका केली. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. ”सरकार सध्या आपल्याला बजेटचे मोठे मोठे आकडे दाखवत आहे. मृतांचा आकडा नक्की किती आहे, किती जखमी आहेत. सध्या त्या ठिकाणी उपचाराची काय सोय आहे, डॉक्टर्स, अन्न, वाहतूक या सगळ्याची महाकुंभच्या ठिकाणी कशी सोय आहे हे सगळे संसदेत मांडा. महाकुंभमधल्या डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबरदारी लष्कराकडे द्या, अशी मागणी अखिलेश यादव यांनी संसदेत केली.

”महाकुंभातील त्या घटनेसाठी जबाबदार व्यक्तीवर तसेच खऱी परिस्थिती लपवणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत नक्की किती भाविकांचा मृत्यू झाला खरा आकडा सरकारने सांगावा. राज्यातील हे डबल इंजिन सरकार मृतांचा आकडा का लपवतेय? असा सवालही अखिलेश यादव यांनी यावेळी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;