नवरीने केले टक्कल आणि चढली बोहल्यावर… नीहार सचदेवाची आगळी-वेगळी स्टोरी

नवरीने केले टक्कल आणि चढली बोहल्यावर… नीहार सचदेवाची आगळी-वेगळी स्टोरी

आपल्या सौंदर्यामध्ये केस हे फार महत्त्वपूर्ण मानले जातात. म्हणूनच काही कारणांमुळे केस गळू लागल्यावर महिलावर्ग हा त्रस्त होतो. परंतु इथे मात्र एक अनोखी नवरी आपल्याला बघायला मिळेल, या नवरीचे नाव आहे नीहार सचदेवा.. नीहार ही हिंदुस्थानात जन्माला आली, परंतु ती वाढली मात्र अमेरिकेमध्ये.

सध्याच्या घडीला सोशल मीडीयावर नीहारच्या नावाची चर्चा रंगू लागलेली आहे. नीहार ही डिजीटल कंटेट क्रिएटर आहे. नुकतेच नीहारने लग्न केले. यावेळी तिने परिधान केलेल्या घागरा याची चर्चा तर रंगलीच, पण नीहार ही टक्कल करुनच बोहल्यावर चढली. त्यामुळे सर्वांच्याच तोंडी नीहारचे नाव आले. लहानपणापासून नीहार ही एलोपिसिया एरीटा या आजाराने त्रस्त होती. एलोपिसिया एरीटा हा एक त्वचा रोग आहे. यामध्ये त्वचेवरील केसगळती होते, खासकरुन डोक्यावरील केस गळतात. यामध्ये शरीरातील इम्यूनिटीही कमी होते. याच आजाराने नीहार लहानपणापासून त्रस्त होते.

नीहारचे लग्न ठरल्यावर तिने कुठलीही कशाचीही तमा न बाळगता, टक्कल करुन बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला.  नीहारच्या या कृत्याचे सर्व माध्यमातून कौतुक होत आहे. नीहारने दाखवलेल्या याधाडसाची नोंद सर्व स्तरातून घेण्यात आली. त्यामुळेच Thebaldbrownbride या अभियानांतर्गत ती नवरी बनली. स्त्रीचे सौंदर्य केवळ तिच्या केसांमध्ये नाही तर, तिच्यातल्या आत्मविश्वासात आहे हे तिने दाखवून दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;