ट्रम्प यांची मोठी कारवाई, अवैध स्थलांतरित हिंदुस्थानींना घेऊन पहिले विमान रवाना

ट्रम्प यांची मोठी कारवाई, अवैध स्थलांतरित हिंदुस्थानींना घेऊन पहिले विमान रवाना

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या आदेशानुसार अमेरिकेने अवैध स्थलांतरितांविरोधात अभियान सुरू केले आहे. या अभिनयाअंतर्गत सोमवारी अमेरिकेतून हिंदुस्थानींना घेऊन पहिले विमान रवाना झाले आहे. अमेरिकन लष्कराचे सी-17 विमान स्थलांतरितांना घेऊन हिंदुस्थानात येत आहे. हे विमान 24 तासांच्या आत हिंदुस्थानात पोहचेल, अशी अमेरिकन अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे.

ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर ही पहिलीच हद्दपारीची कारवाई आहे. अमेरिकेतील अवैध हिंदुस्थानी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली होती. यापूर्वी, हिंदुस्थानने अवैध स्थलांतरितांना परत घेण्यास सहमती दर्शविली होती.

ट्रम्प प्रशासनाने अवैध स्थलांतरितांविरुद्धच्या या मोहिमेत अमेरिकन सैन्याचीही मदत मागितली आहे. अमेरिका-मेक्सिको सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले असून स्थलांतरितांना ठेवण्यासाठी लष्करी तळांचा वापर केला जात आहे. अवैध स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी लष्करी विमानांचा वापर केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;