UP Railway Accident – फतेहपूरमध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक, गार्डचा डब्बा आणि इंजिन रुळावरून उतरले
उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात एका मालगाडीचे इंजिन आणि गार्डचा डबा रुळावरून खाली घसरला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातमुळे अप मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
खागा कोतवाली क्षेत्रातील पाम्भीपूरमध्ये एक मालगाडी सिग्नल न मिळाल्याने उभी होती. यावेळी त्याच ट्रॅकवर आलेल्या दुसऱ्या मालगाडीने तिला धडक दिली. धडक दिल्यानंतर एका मालगाडीचा गार्डचा डबा आणि इंजिन रुळावरून उतरला. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List