Kalyan Rape Case : कल्याण बलात्कार पीडितेच्या घरावर हल्ला

Kalyan Rape Case : कल्याण बलात्कार पीडितेच्या घरावर हल्ला

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेतील आरोपी नराधम विशाल गवळी व त्याची पत्नी जेलमध्ये आहेत. मात्र गवळीचे हस्तक पीडित कुटुंबाला केस मागे घेण्यासाठी वारंवार धमकावत आहेत. रविवारी मध्यरात्री  तीन गुंडांनी कुटुंबीयांना शिवीगाळ करत घराबाहेर तोडफोड केली.

 विशालला जामीन झाला तर एके-47 घेऊन येऊन गोळ्या घालू, अशी धमकीच गुंडांनी कुटुंबाला दिल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.  पीडित मुलीचे कुटुंब या धक्क्यातून अजून सावरलेले नसताना गवळीचे हस्तक त्यांच्यावर केस मागे घेण्यासाठी दबाब आणत आहेत. कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी असतानाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच रविवारी रात्री तीन अज्ञात गुंडांनी दारू पिऊन घराबाहेर धिंगाणा घातला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात पैद झाली. या प्रकरणी पुरुषोत्तम शेलार या तरुणाला बेड्या ठोकल्यात.विशाल गवळीच्या तिघा भावांना  तडीपार केले  आहे. तरीही यातील दोघे अजूनही  राजरोस फिरत असल्याचा आरोप  आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

दरम्यान या प्रकरणात कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची तडकाफडकी कल्याण पोलीस पंट्रोलमध्ये बदली करण्यात आली आहे. डीसीपी अतुल झेंडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;