धक्कादायक! गोव्यात टॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याने संपवले जीवन

धक्कादायक! गोव्यात टॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याने संपवले जीवन

टॉलीवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 650 कोटींची कमाई केलेला रजनीकांत यांच्या ‘कबाली’ सिनेमाच्या निर्मात्याने आत्महत्या केली आहे.  सोमवारी उत्तर गोव्यातील एका गावात भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळला. या बातमीने मनोरंजन सृष्टीला धक्का बसला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

गोव्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केपी चौधरी (44) म्हणजेच शंकरा कृष्ण प्रसाद चौधरी असे त्यांचे नाव असून त्यांचा मृतदेह सिओलीम गावात लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. अंजुना पोलीस ठाण्याच्या सिओलीम चौकीला घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. सायबराबाद स्पेशल ऑपरेशन टीमने केपी यांना 2023 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यानंतर ते नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे.

रजनीकांत यांचा सुपरहिट सिनेमा ‘कबाली’ 2016 मध्ये रिलीज झाला होता, ज्याची निर्मिती केपी चौधरी यांनी केली होती. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सिनेमाने तेव्हा जगभरात 650 कोटींहून अधिक कमाई केली होती आणि त्यावर्षी तामिळ सिनेमाच्या सर्वात मोठ्या सिनेमांच्या यादीत तो टॉपवर होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;