Grammy Awards 2025: प्रसिद्ध रॅपरच्या पत्नीने रेड कार्पेटवरच काढले कपडे, सर्वजण थक्क; अखेर जोडप्याला काढलं बाहेर
संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार सोहळा 2025 नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. मात्र प्रसिद्ध अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट आणि त्याची पत्नी बियांका सेन्सरी यांच्या एण्ट्रीने सर्वजण थक्क झाले.
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात कान्येला दोन नामांकनं मिळाली होती. यावेळी तो पत्नी बियांकासोबत रेड कार्पेटवर पोहोचला होता. कान्येनं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर बियांकासुद्धा सुरुवातीला काळ्या रंगाचा मोठा कोट परिधान करून रेड कार्पेटवर आली होती.
मात्र रेड कार्पेटवर येताच बियांकाने तिचा काळा कोट काढला आणि पूर्णपणे पारदर्शी कपड्यांमध्ये फोटोसाठी पोझ दिले. बियांकाचा हा न्यूड लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. हाय-प्रोफाइल कार्यक्रमात अशा पद्धतीचे कपडे घातल्याने बियांकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List