नील नितिन मुकेशला का घेतलं होतं न्यूयाॅर्क विमानतळावर ताब्यात?
अभिनेता नील नितीन मुकेश याने त्याच्या अमेरिकेच्या भेटीतील एक धक्कादायक अनुभव शेअर केला, जिथे त्याला न्यूयॉर्क विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या राष्ट्रीयत्वाबद्दल चौकशी करण्यात आली. मॅशेबल इंडियाशी बोलताना नीलने खुलासा केला की, हिंदुस्थानी पासपोर्ट असूनही, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तो हिंदुस्थानी असल्याचे मानण्यास नकार दिला. मॅशेबल इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये नीलने हा धक्कादायक किस्सा शेअर केला. एका चित्रपटाच्या शुटींगसाठी तो गेला असता, ही घटना घडली असल्याचे त्याने मुलाखतीमध्ये सांगितले.
अभिनेता नील नितीन मुकेशला न्यूयाॅर्क विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी तो म्हणाला की, माझ्याकडे हिंदुस्थानी पासपोर्ट आहे यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. इतकंच नव्हे तर, पोलिसांनी माझा जबाब नोंदवायला आणि म्हणणं मांडायलाही मनाई केली होती. तब्बल चार तास चौकशीनंतर पोलिसांनी माझं मत विचारलं… त्यावेळी मी त्यांना फक्त इतकंच म्हटलं की, गूगल करा मग तुम्हाला कळेल. पोलिसांनी गूगल केल्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यानंतर मात्र त्यांनी कुतूहलापोटी माझ्या पूर्ण कुटुंबाची चौकशी केली.
नील हा गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रीय असून, न्यूयाॅर्क, जाॅनी गद्दार यासारख्या सिनेमांमध्ये त्याने काम केले आहे. नील मुकेश यांच्या घराण्यातील बहुसंख्य हे गायनाच्या क्षेत्रात कार्यरत असून, नील यांनी मात्र अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List