अमिताभ बच्चन – जया बच्चन यांची सून, तिने 2 वर्ष काढले तुरुंगात, आज आहे ओटीटी स्टार

अमिताभ बच्चन – जया बच्चन यांची सून, तिने 2 वर्ष काढले तुरुंगात, आज आहे ओटीटी स्टार

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता देखील आमिताभ आणि जया बच्चन यांची सूनेची चर्चा रंगली आहे. अमिताभ आणि जया यांची सून म्हटल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचं नाव सर्वांसमोर येतं. पण आता ऐश्वर्या राय हिची नाही तर, अभिताभ आणि जया यांच्या अन्य एका सूनेची चर्चा रंगली आहे. जिच्याहबबद्दल फार कोणाला माहिती नाही. तिने 2 वर्ष तुरुंगात कैद्यांसोबत काढले आहेत. तर आता ती प्रसिद्ध ओटीटी स्टार आहे.

अमिताभ आणि जया बच्चन यांची ही सून प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टार असून तिने वो ‘मेंटलहुड’, ‘डेल्ही क्राइम’, ‘द नाइट मॅनेजरट, टकोटा फॅक्टरी’ आणि ‘लस्ट स्टोरी 2’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या अमिताभ आणि जया बच्चन यांच्या ज्या सूनेची चर्चा रंगली आहे तिचं नाव तिलोत्तमा शोम आहे.

तिलोत्तमा शोम हिने तुरुंगात काढले 2 वर्ष

तिलोत्तमा शोम हिने दोन वर्षे तुरुंगात काढले आहेत पण कोणत्याही गुन्ह्यामुळे नाही तर, न्यूयॉर्कमध्ये राहत असताना तिलोत्तमा शोम हिने रायकर्स आयलंड तुरुंगात दिवस काढले. कारण ती तुरुंगातील लोकांच्या सायक्लोजीचा अभ्यास करत होती. यावेळी ती खुनाचा आरोप असलेल्या अनेक कैद्यांना देखील भेटली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tillotama Shome (@tillotamashome)

 

तुरुंगात राहूनच अभिनयही शिकल्याचं तिलोत्तमा शोमाचं मत आहे. अभिनेत्रीने कोणत्याही अभिनय शाळेतून अभिनयाचं शिक्षण घेतलं नाही. तुरुंगात असतानाच गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना जवळून पाहण्याची संधी मिळाल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितलं. शिवाय मानवी वर्तन समजून घेण्याची संधीही तिला मिळाली.

बच्चन कुटुंबासोबत तिलोत्तमा शोम यांचं नातं

तिलोत्तमा शोम हिचं बच्चन कुटुंबाशी खूप जवळचं नातं आहे. ती जया बच्चनची बहीण रिटा भादुरी यांचा मुलगा कुणालची पत्नी आहे. याच नात्याने तिलोत्तमा ही महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून आहे. तिलोत्तमा हिच्या लग्नात देखील संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
तिलोत्तमा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;