तृतीयपंथी मराठी अभिनेत्रीने केलं लग्न, फोटो शेअर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
मराठी सिनेसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री प्रणित हाटे हिनं लग्न केलं असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. शनिवारी 1 फेब्रुवारी 2025 या दिवशी तिने लग्न केल्याचं म्हटलं जात आहे.
प्रणितने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने फोटो शेअर करताना तिच्या नवऱ्याचं नाव मात्र सांगितलेलं नाही. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, गणपती बाप्पााच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात करतेय. तसेच तिने #married #justmarried असे हॅशटॅग देखील दिले आहेत.
या लग्नात प्रणितने लाल रंगाची साडी नेसली होती. तर साजेसा मेकअप केला होता. तिने शेअर केलेल्या फोटोत प्रणितच्या हातात हिरव्या रंगाचा चुडा पाहायला मिळत आहे. तर तिच्या पतीने पांढरा कुर्ता-पायजामा व लाल जॅकेट घातल्याचे दिसते.
प्रणित हाटे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचे इन्स्ट्राग्रावर अनेक चाहते आहेत. सध्या तिच्या लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून ते चर्चेचा विषय बनले आहेत. नेटकरी देखील तिंच अभिनंदन करत आहेत. तसेच अनेक चाहत्यांनी तिला फोटो पाहून खरंच लग्न केलं की मालिकांच्या प्रमोशनसाठी असे फोटो टाकले? असा प्रश्न देखील विचारला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List