सोनम कपूर रॅम्प वॉक करताना ढसाढसा रडू लागली; नक्की काय झाल? भावनिक व्हिडिओ

सोनम कपूर रॅम्प वॉक करताना ढसाढसा रडू लागली; नक्की काय झाल? भावनिक व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली तरी ती इतर अॅक्टीव्हिटींमध्ये कायम सहभाग घेताना दिसेत. जसं की फोटोशूट, फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक, तसेच ती सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. दरम्यान सोनम तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. तिची स्टाइल नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते. इव्हेंट असो किंवा सोशल मीडिया, सोनमचा लूक नेहमीच चर्चेत असतो.

सोनमचा रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

नुकतीच सोनम कपूर एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. मात्र सोनमचा हा रॅम्प वॉकचा व्हिडीओ  सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामागे कारणही खास आहे. कारण हा रॅम्प वॉक करते वेळी अचानक सोनम भावूक झाली रडू लागली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

सोनम अचानक भावूक का झाली?

प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल याचं गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी निधन झालं. या शोदरम्यान सोनम कपूर, करीना कपूर, अनन्या पांडे यांसारख्या मोठ्या व्यक्तींनी सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली.

सोनम रोहित बलने डिझाइन केलेल्या आउटफिट्समध्ये अनेकदा दिसली होती आणि तिने त्याच्यासाठी रॅम्प वॉकही केला होता. त्याच्यासोबत सोनमची मैत्री फार घट्ट होती. त्यामुळे या शो दरम्यान रोहित बलची आठवण आल्याने सोनम भावूक होऊन रडायला लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोनमचा लूक आणि मेकअप कसा होता?

या रॅम्प वॉक दरम्यान सोनम कपूरने ऑफ-व्हाइट ड्रेस परिधान केला होता आणि त्यावर डिझायनर श्रग कॅरी केला होता. तिच्या केसात गुलाबची फुलेही माळण्यात आली होती. तसेच तिच्या हातातही गुलाब होते.तसेच हलका मेकअप आणि गडद लिपस्टिकने तिचे सौंदर्य आणखी वाढले होते. या लूकमध्ये सोनम खूपच गोड आणि सुंदर दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

मित्राच्या आठवणीने भावूक

शोनंतर एएनआयशी बोलताना सोनम म्हणाली, “गुड्डा (रोहित बल) साठी इथे येऊन मला खूप आनंद झाला आहे. त्यांनी डिझाईन केलेला ड्रेस परिधान करून त्याच्यासाठी रॅम्पवॉक करण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्याचा शेवटचा शो माझ्यासाठी खूप खास आणि भावनिक होता. रोहित बलच्या डिझाईन्सचे कौतुक करताना सोनम म्हणाली की, त्याच्या डिझाईन्स अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर होत्या, यामुळेच ते आउटफिट एवढे खास बनायचे.”  असं म्हणत तिने मित्राची आठवण काढली.

सोनमच्या कामाबद्दल…

सोनम कपूरने तिचा शेवटचा चित्रपट ‘ब्लाइंड’ 2023 मध्ये केला होता, जो तिने तिच्या गरोदरपणापूर्वी शूट केला होता. मुलगा वायुच्या जन्मानंतर सोनम काही काळ चित्रपटांपासून दूर राहिली, पण ती अनेकदा इव्हेंट्स आणि शोमध्ये दिसते.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;