मरणानंतरही न संपणाऱ्या आईच्या मायेची गोष्ट सांगणारी ‘तुला जपणार आहे’ मालिका; जाहीर झाली तारीख
झी मराठी वाहिनीवरील 'तुला जपणार आहे' या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला असून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे. या मालिकेतून शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. तसंच यामध्ये नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
'तुला जपणार आहे' ही कथा आहे, एका आईची.. अंबिकाची; जिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचं व्रत घेतलंय. आत्मा रुपात ती तिच्या आजूबाजूला असणार आहे. परंतु आत्मारुपात तिला तिच्या जाण्यानंतर दिसतात ते घरातले बदललेले फासे आणि तिच्या मुलीच्या जीवावर उठलेले लोक, तिच्या जाण्यानंतर मुलगी आणि वडिलांमध्ये झालेली ताटातूट.
या सगळ्यांचा पाठलाग करत अंबिकाच्या प्रार्थनांना प्रतिसाद देत देवीने तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी मीराला पाठवलं, जिची देवीवर नाराजी आहे, जिचा देवीवर विश्वास नाही. अशी मीरा आत्मारूपी अंबिकाला पाहू शकते, तिला स्पर्श करू शकते, तसंच अंबिका तिच्यासोबत देवळाच्या पायऱ्याही चढू शकते.
या दोघींच्या या नात्यामागचं गूढ असेल तरी काय? अंबिकाच्या मदतीला धावून आलेली मीरा कशी तिच्या मुलीच्या आयुष्यात येणार हे पाहण्यासारखे असेल. 'तुला जपणार आहे' या हॉरर, थ्रिलर आणि फॅमिली ड्रामा असणाऱ्या मालिकेतील प्रसंग आणि घटना 'लार्जर दॅन लाइफ' असणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List