वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा संपन्न; भाविकांची गर्दी

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा संपन्न; भाविकांची गर्दी

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर रविवारी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला. सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला शुभ्र वस्त्र तसेच रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.

विठ्ठल रूक्मिणीमातेची पाद्यपुजा दुपारी 12 वाजता सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या शुभहस्ते पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजे विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजविण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली.

दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधण्यात आल्या. यानंतर अंतरपाट धरले आणि मंगलाष्टकास सुरुवात झाली. त्यामध्ये मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टके म्हटली. मंगलाष्टके झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला. यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन येथे भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;