राष्ट्रपती भवनात पार पडणार विवाहसोहळा; 12 फेब्रुवारीला ताईच्या लग्नाला यायचं हं!

राष्ट्रपती भवनात पार पडणार विवाहसोहळा; 12 फेब्रुवारीला ताईच्या लग्नाला यायचं हं!

राष्ट्रपती भवनात एक विवाह सोहळा पार पडणार आहे. देशाच्या इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडत आहे. याआधी राष्ट्रपती भवनात केवळ राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम झालेला आहे. राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्समध्ये पहिल्यांदाच शहनाईचा आवाज गुंजणार आहे. लग्न होणाऱ्या  सीआरपीएफ अधिकारी महिलेचे नाव पूनम गुप्ता आहे. पूनम सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत असून त्या  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत तैनात आहेत. या लग्नसोहळ्याबद्दल राष्ट्रपती भवनाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. प्रोटोकॉलमुळे पूनम व तिच्या कुंटुंबीयांनी यावर  भाष्य करण्यास नकार दिला आहे.

कधी आहे लग्न?

पूनम गुता आणि अवनीश कुमार यांचा विवाह सोहळा 12 फेब्रुवारीला पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूनम हिच्या मवाळ वागण्याने, मधुर बोलण्याने आणि कर्तव्यनिष्ठsने खूपच प्रभावित झाल्या आहेत. पूनमचे लग्न होणार असल्याचे कळताच मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा, क्राऊन का@म्प्लेक्स येथे त्यांच्या लग्न सोहळ्याला परवानगी देत. मुर्मू यांनी स्वतःहून पुढाकार घेतला.

जम्मूकश्मीरमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट अवनीश पुमारसोबत पूनम लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नसोहळ्याला फक्त दोन्ही पुटुंबातील जवळचे लोकच उपस्थित राहणार आहेत. पूनमचे वडील हे शिक्षक आहेत.

कोण आहे पूनम गुप्ता?

सहायक कमांडंट असलेली पूनम गुप्ता हिने 2024 मधील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सीआरपीएफच्या महिला तुकडीचे नेतृत्व केलेले आहे. पूनम गुप्ता गणित विषयात पदवीधर असून इंग्रजी साहित्यात मास्टर्स केलेले आहे. पूनमने ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातून बी.एड.ही पूर्ण केले आहे. ती जवाहर नवोदय विद्यालय श्योपूरची माजी विद्यार्थिनी आहे. यूपीएससी उत्तीर्ण करून ती सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट बनली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;