प्रबोधन गोरेगावची मराठी कथाकथन स्पर्धा

प्रबोधन गोरेगावची मराठी कथाकथन स्पर्धा

प्रबोधन गोरेगाव संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित यंदाची ‘समाजसेवक उद्योगपती नीळकंठ ऊर्फ भाईसाहेब सावंत स्मृती’ मराठी कथाकथन स्पर्धा 22 व 23 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रबोधन क्रीडा भवन, सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम येथे ही स्पर्धा पार पडेल. मुंबई (शहर व उपनगरे), ठाणे, पालघर आणि रायगड या जिह्यांतील 35 ते 65 वर्षे वयोगटातील सर्वांसाठी स्पर्धा खुली आहे.

विजेत्यांना प्रथम क्रमांकास 11 हजार, द्वितीय क्रमांकास 7 हजार व तृतीय क्रमांकास 5 हजार रुपये आणि  प्रत्येकी 1 हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके, स्मृतिचिन्ह दिले जाईल. पहिल्या तीन पारितोषिक विजेत्यांपैकी ज्यांची स्वलिखित विनोदी कथा असेल त्यांना 3 हजार रुपयांचे स्वतंत्र विशेष काwशल्य पारितोषिक दिले जाईल. कथा स्वलिखित, अन्य लेखकाची अथवा अनुवादित चालेल. परंतु सद्भिरुचिहीन नसावी. सादर करताना कथा मुखोद्गतच हवी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. इच्छुकांना prabodhankridabhavan2014 @gmail.com या ई-मेलवर अर्ज करावे लागतील. स्पर्धेसाठी प्रवेश मूल्य 200 रुपये इतके आहे. हे प्रवेश मूल्य 7506760676 या मोबाईल क्रमांकावर अदा करावे लागेल. www.prabodhan.org या संकेतस्थळावर स्पर्धेची अधिक माहिती उपलब्ध आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;